महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत प्रत्येक आघाडी आणि पक्ष आपापले दावे, आश्वासने करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. अशात आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबतही आपलं मत व्यक्त केले. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, आम्हीच सरकार स्थापन करू. भगिनींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युती जिंकल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? त्यावर ते म्हणाले, महायुती स्थापन होणारच. सर्व आमदार एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील. आतापर्यंत महायुतीचे मुख्यमंत्री व्हायचे एवढेच ठरले आहे.’ शरद पवारांचे विचार जुने आहेत का? शरद पवारांचे विचार आजच्या तरुण पिढीला सुसंगत आहेत का? असाही प्रश्न अजित पवार यांना या मुलाखतीत विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले, ‘शरद पवार असा नाही ते अजिबात जुने विचार करत नाहीत. तरुण पिढीलाही ते आपल्यासोबत बसवतात, जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.’ असेही ते म्हणाले.