पुणे जिल्हा | स्वार्थासाठी बाप बदलला, तर जनतेला पटत नाही
Updated On:

बारामती, (प्रतिनिधी)- किती दमदाटी केली, तरी लोक आता बघत नाही. बघतो तुला, बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तु चोरली, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला, तर जनतेला ते पटत नाही.
अशी चारोळ्या म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता बारामतीत खासदार अमोल कोल्हे यांनी सडकून टीका केली. बारामतीत शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. कोल्हे म्हणाले, बारामतीकरांनी लोकसभेला दाखवून दिले आहे.
आता वेळ आली आहे त्यांची जागा दाखवून द्यायची. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य नव्हे देशातील सरकार बदलणार आहोत. त्यामुळे लोकसभेसारखे काम आपल्याला करायचे आहे, असे कोल्हे यांनी आवाहन केले.





