Sanjay Shirsat : संजय राऊत शहीद झाले असते तर…; संजय शिरसाटांची जीभ घसरली

मुंबई : काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावर का जात नाहीत, म्हणून त्यांनी फडणवीसांना देखील चिमटा काढला. त्यांच्या या टीकेला शिवसेना पक्षाचे आमदार व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली. मात्र यावेळी टीका करताना त्यांची जीभ घसरली.
काय म्हणाले संजय शिरसाट ?
कुंभमेळ्यात जाऊन किती भाविक मेले ते मोदी सरकारने पाहिलं पाहिजे होतं, असं राऊत म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले संजय राऊत कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या वेळी जायला पाहिजे होते. तिथे त्यांच्या अंगावर सर्वजण पडले असते आणि राऊत चेंगरले असते तर कमीत कमी शहीद झाले असते. रोज तोंडातील घाण पसरवण्यापेक्षा गंगेत गेला असं तरी सांगितलं गेलं असतं. पण दुर्देव आहे. आम्हाला ती संधीही त्यांनी दिली नाही, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
संजय राऊतांना दिला इशारा
रेडे आणि शिंग तिथे आहे म्हणतात. मलाही बंगला नाही. मग माझ्या इथेही रेड्याचे शिंग आहेत का. असे विधानं करणं थांबवलं पाहिजे, असे आवाहन शिरसाट यांनी राऊतांना केले आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही विद्वान आहात. पण लोकं तुम्हाला मूर्खात काढतात हे सत्य आहे. अशा पद्धतीने बोलून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसवरणं तुमच्या अंगलट येईल. लोकं आणि सरकार तुमचा बंदोबस्त करेल, असा इशारा शिरसाटानी संजय राऊतांना दिला आहे.





