लॉकडाऊनबाबत अफवा पसरवाल तर…; अनिल देशमुखांनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई – राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध घालण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी लॉकडाऊनच्या देखील अफवा पसरत आहेत. अशा अफवा पसरविणाऱ्यांना अनिल देशमुख यांनी कडक इशारा दिला आहे.

काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यामुळे जनमानसात संभ्रमाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबर विभाग आता नजर ठेवणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.