शिवराजसिंह चौहानांनी ज्योतिरादित्य सिंधीयांना दिली विभीषणाची उपमा
नवी दिल्ली : देशातील मध्यप्रदेशात दोन दिवसांपुर्वी एकच वादळ निर्माण उठले होते. त्यातून ज्योतिरादित्य सिंधीया यांनी कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेल्या या पक्ष बदलावर आता माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देताना त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमनलाथ यांचा रावण असा उल्लेख करत कॉंग्रेसला टोला लगावला आहे. एवढेच नाही तर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा विभीषण असा उल्लेख केला.
Madhya Pradesh: Jyotiraditya Scindia arrives at Shivraj Singh Chouhan’s residence in Bhopal. pic.twitter.com/HJp9lJI6bq
— ANI (@ANI) March 12, 2020
लंका जाळण्यासाठी विभीषणची गरज लागते असंही यावेळी ते म्हणाले आहेत. कॉंग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, कॉंग्रेस सोडून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्यना आधी महाराज म्हणायचे आणि आता माफिया म्हणत आहेत. एका दिवसात ज्योतिरादित्य माफिया झाले का?
भाजपात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच भोपाळमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या स्वागतासाठी आयोजित सभेत बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी कॉंग्रेसवर टीका केला. यावेळी बोलताना, कमलनाथजी..आमच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेणार असे मी म्हटले होते. कमलनाथ यांच्यावर जनता आणि भाजपा कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोप चौहान यांनी यावेळी केला. तसेच याचे (बंगला, हॉटेल, रिसॉर्ट) तोडून टाका, याला संपवून टाका. तुमच्या घरचे राज्य आहे का? जर तुम्ही योग्य प्रकारे काम केले असते तर आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो असेही चौहान यांनी म्हटले. याचबरोबर,पण आज आम्ही संकल्प करतो की, कमलनाथजी जोपर्यंत तुमच्या पाप, अत्याचार, अन्याय, भ्रष्टाचार आणि दहशतीच्या लंकेला जाळून नष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यावेळी भाजपात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाहत त्यांनी म्हटले की, पण रावणाची लंका जाळायची असेल तर विभीषणाची गरज असते.