मुंबई – नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या अफवा आता सामान्य झाल्या आहेत. हे दोन्ही स्टार्स एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांवर दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पण, यादरम्यान, रश्मिकाबाबत एक आणखी नवीन चर्चा सुरु झाली आहे, नवीन रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना विजय देवरकोंडा नाही तर तेलगू अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवासच्या प्रेमात आहे. रश्मिका आणि बेल्लमकोंडा साई श्रीनिवास या दिवसांमध्ये अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. त्यामुळे दोघांच्या जवळीकतेची चर्चा सुरू झाली आहे. पण, सत्य हे आहे की, रश्मिका आणि श्रीनिवास दोघेही एकमेकांना आवडतात.
रश्मिका मंदान्ना साई श्रीनिवासला डेट करत आहे. आतापर्यंत रश्मिका किंवा बेल्लमकोंडाच्या टीमकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही.’ विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि बेल्लमकोंडा साई श्रीनिवास मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. त्यानंतर आता दोघांच्या डेटींगच्या अफवा जोरात आहेत.