Eknath Shinde | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टजवळ काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस पथकाने छापा टाकत 45 किलो अमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अमली पदार्थांची किंमत 145 कोटी रुपये आहे. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीचे असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. याशिवाय साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र अंधारे यांचे आरोप सर्व आरोप प्रकाश शिंदे यांनी फेटाळले. तसेच ते हॉटेल आपण चालवत नाही, दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे, अशी माहिती प्रकाश शिंदेंनी दिली. मात्र आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अंधारेंनी ते हॉटेल प्रकाश शिंदेंचं आहे आणि तेच ते हॉटेल चालवत असल्याचे पुरावे त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहेत. हॉटेल प्रकाश शिंदे यांचे असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी ते हॉटेल प्रकाश शिंदे यांचंच असल्याचा दावा करत पत्रकार परिषदेत आपल्या फोनवरून प्रात्यक्षिक दाखवत पुरावे दिले. “गुगलमध्ये जाऊन तुम्ही तेजयश त्या हॉटेलचं नाव टाकलं तर ते येतं, प्रकाश शिंदे खोटं का बोलले, ते म्हणाले हे माझं हॉटेल नाही. “वाल्मिक कराड प्रकरणी मुंडेंचा राजीनामा घेतला, तर शिंदेंचा…”; पुरावे दाखवत सुषमा अंधारेंची मागणी जर ही जागा कमर्शियल नसेल तर त्याला रेटिंग कशी काय येईल, याला 4.8 चा रेटिंग आहे, गुगलवर डायरेक्शन आहे आणि व्हॉट्सॲप नंबर देखील दिलेला आहे, इथे ऑनलाईन बुकिंगही करता येते. तिथे दिलेल्या नंबरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये प्रकाश शिंदे असं नाव इथे आलं, हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदे चालवतात कारण इथे त्यांचा नंबर दिलेला आहे,” असे म्हणत त्यांनी पुरावा दाखवला. Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा’ यावेळी सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा मागितला आहे. “मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागत आहे. वाल्मिक कराड प्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत. मग उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासाला आपले पद प्रभावित करू शकतं असं वाटत असेल तर राजीनामा द्या, अशी मागणी अंधारेंनी केली आहे. Eknath Shinde | ‘पालकमंत्री नेमकं काय करत आहेत?’ पुढे अंधारे म्हणाल्या की, “मला तुषार दोषी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या दोघांनाही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही नेमकं काय करत होतात. तिथल्या पालकमंत्र्यांना कळलं पाहिजे की राज्यातील सर्वात महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे. ज्याअर्थी तिथे इतकं सगळं होत आहे, तिथे कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेलं तरी त्यांना कळणार नाही, पालकमंत्री नेमकं काय करत आहे? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. Eknath Shinde | हेही वाचा: “देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव…”; राऊतांच्या दाव्याने टेन्शन वाढवलं म्हणाले “कोकाटे…”