“लोणीकरांनी माफी काय तर, ठोकलं पाहिजे”; बच्चू कडूंनी व्यक्त केला संताप

Bachchu Kadu | भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोकायला पाहिजे, असे म्हणत संताप व्यक्त केला.
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून मंगळवारी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यानंतर नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले.
याबाबत प्रश्न विचारला असता, बच्चू कडू म्हणाले, “लोणीकर ज्या पद्धतीने बोलताय आणि कृषीमंत्री देखील बोलताय त्यामुळे त्याला माफी मागून चालणार नाही. तर ठोकून पुरून उरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे”, असं बच्चू कडू म्हणाले. Bachchu Kadu | Bachchu Kadu |
दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गुरूकूंज मोझरी येथे त्यांनी नुकतेच आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले. सरकारने आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले, मात्र त्यांची संघर्षांची भूमिका कायम आहे.
काय म्हणाले होते बबनराव लोणीकर?
“सोशल मीडियावर चार-पाच कार्टी असतात, त्यांचा मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाचे पेन्शन बबनराव लोणीकरने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६ हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या आई, बहीण आणि पत्नीला लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायावरची चप्पल आमच्यामुळेच आहे. हातातले ते मोबाईलचे डबडे आमच्यामुळे आणि आमचेच घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो,” असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले होते.
हेही वाचा :




