भाजपला फायदा झाला तर मी मरण स्वीकारेल- प्रियांका गांधी

नवी दिल्ली: भाजपला फायदा झाला तर मरण स्वीकारेल. विनाशक विचारधारेसोबत मी संपूर्ण जीवनात कधीही तडजोड करणार नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे भाजपला फायदा होण्याचा प्रश्नच नाही, असे काँग्रेसचे महासचिव प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले.

प्रियंका गांधी म्हणाल्या, काँग्रेसने सर्व उमेदवार हे सक्षम दिले आहे. आमचा कुठलाही दुसऱ्या हेतू नाही. भाजपला फायदा होईल असं आम्ही काहीही करणार नाही. उलट आमचे उमेदवार भाजपची मतं खातील. हे आम्ही खूप विचारपूर्वक केलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.