नवी दिल्ली – पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी घोषणा केली आहे. सीएम मान पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करणार आहेत. शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या पुण्यतिथीला 23 मार्च रोजी हा क्रमांक जारी केला जाईल. हा माझा व्हॉट्सअॅप नंबर असेल असे मान यांनी सांगितले.
दरम्यान कोणी लाच मागितली तर नकार देऊ नका, ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठवा. माझे कार्यालय याची सखोल चौकशी करेल आणि भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.
दिल्लीचे उदाहरण देताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या 49 दिवसांच्या सरकारमध्ये असाच क्रमांक जारी करण्यात आला होता. ज्यानंतर भ्रष्टाचार संपुष्टात आला. तेव्हापासून फक्त केजरीवाल सत्तेवर येत आहेत. पंजाबमध्येही याच पद्धतीने भ्रष्टाचार हाताळला जाईल, असंही मान यांनी म्हटलं.
पंजाबमध्ये घोषणा होताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भगवंत मान यांचे खूप कौतुक केले. ते म्हणाले की, आम्ही दिल्लीत याची सुरुवात केल्यानंतर भ्रष्टाचारी घाबरू लागले. एखादा अधिकारी लाच मागायला लागली, लोक म्हणायचे, मोबाईल काढू का? यामुळे भ्रष्टाचार संपला. आता पंजाबमध्येही याच पद्धतीने भ्रष्टाचार संपणार आहे.