मुंबई- अभिनेता अभिषेक बच्चन ला विविध स्तरावर नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. बच्चन असल्याने त्याला अधिक लोकांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नेटकऱ्यांमध्ये अभिषेक नेहमीच निशाण्यावर असतो.
मात्र आता हे ट्रोलींगपाहून अभिषेक या ट्रोलर्सला उत्तरं देऊ लावला आहे. त्यात काही उत्तरं ही भन्नाट असतात. केवळ महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून ट्रोल करणाऱ्यांना अभिषेक चांगलेच उत्तर देत असतो. नेपोटिझमप्रकरणातही अभिषेकवर वडिलांची कृपा म्हणत टीका करण्यात आली होती. यावर अभिषेक बच्चनने सणसणीत उत्तर देत, सगळ्यांची बोलती बंद केली होती.
एका ट्विटर वापरकर्त्याने अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) एएनआयच्या फोटोद्वारे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एएनआयने पोस्ट केलेल्या या फोटोतील शेतकऱ्याचा चेहरा काहीसा अभिषेक बच्चनशी साधर्म्य असणारा आहे. एएनआयचा हाच फोटो शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जर अभिषेक ‘बच्चन’ नसता तर…’. हा फोटो शेअर करत त्याने अभिषेक बच्चनला ट्रोल (Troller) करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहमीप्रमाणेच अभिषेकने त्याची ही थट्टा गमतीने घेत, सदर वापरकर्त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. ‘हाहाहा…मजेदार… तरीही मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो!’, असे म्हणत जुनियर बच्चनने या वापरकर्त्यालाच टोला हाणला.
If Abhishek wasn’t “Bachchan” pic.twitter.com/wcny9GU37v
— Gentle Giant (@iKunaal) November 9, 2020