मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. ते राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सर्व घडामोडींनंतर आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज अजित पवार आणि शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात अजित पवार गटाच्या आमदार आणि समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षातील फुटीचं कारण स्पष्ट केलं आहे. आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याचा नेमका इशारा कुणाकडे होता हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही.
छगन भुजबळ म्हणाले की, “राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचा दावा करत छगन भुजबळ यांनी अचानक आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. शरद पवार यांच्या निकटवर्तींयामध्ये सध्या बिनकामांच्या बडव्यांची गर्दी असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचंही ते म्हणाले.