पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आणि सर्वांत मोठी असलेली नीरा ग्रामपंचायत. 2009 पासून नीरा येथील ज्येष्ठ नागरिक एका चांगल्या व समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणारा आणि शहराच्या विकासासाठी पूर्ण वेळ देऊन काम करणाऱ्या एका तरुणाच्या शोधात होते. त्यांचा हा शोध 2010 साली संपला. नीरा विकास आघाडीला राजेश काकडे नावाचा उमदा तरुण भेटला. 2010 च्या निवडणुकीत राजेश काकडे यांनी नीरा ग्रामपंचायतीवर नीरा विकास आघाडीच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व मिळवत ही निवडणूक जिंकली.आणि त्यांना लोकांनी मोठ्या विश्वासाने सरपंचपदी विराजमान केले राजेश काकडे म्हणजे सामाजिक कार्याचा वसा घेतलेला तरुण. सरपंच होण्यापूर्वीपासूनच ते समाजातील विविध कार्यक्रमात सहभागी होत असत. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. तरुणांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी म्हणून सुद्धा त्यांनी चांगले काम केले. 31 डिसेंबर रोजी “दारू नको दूध प्या’ असे उपक्रम त्यांनी राबवले. सार्वजनिक कार्यक्रमात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. गणपती उत्सव, विविध ऐतिहासिक लोक, समाजसुधारकांच्या जयंत्या साजऱ्या करून थोरामोठ्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजातील सर्वच जातीधर्मातील लोकांना एकत्र करून त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. त्याचबरोबर विविध धर्माचे सणवार सुद्धा साजरे करतात. त्यामुळे नीरेकर नागरिकांनी त्यांना लगेच स्वीकारले मागील 15 वर्षे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून नीरेतील नागरिकांची सेवा करतायत. पहिल्या पाच वर्षात त्यांनी नीरा शहराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. उघडी गटारे बंद केली, रस्ते तयार केले बहुतांश रस्त्यांचे मजबुतीकरण करून त्यावर कॉंक्रिटीकरण केले. “स्वच्छ सुंदर नीरा’ असा नारा देत कचरामुक्त नीरा केली. त्याचबरोबर कचरा कुंडीमुक्त शहर करून घंटागाडी उपलब्ध करून दिल्या त्यामुळे गावात कचरा दिसेनासा झाला एकेकाळी घाणीचे साम्राज्य असणारी नीरा “आज स्वच्छ आणि सुंदर’ शहर म्हणून ओळखले जाते. काकडे यांचा स्वभाव हा लोकांमध्ये रमणारा आहे.विरोधकालाही आपलंसं करून घेत त्यांनी विकासकामात कुठेही अडथळा येऊ दिला नाही. विकासाचा यज्ञ कुठे थांबू नये म्हणून वेळप्रसंगी त्यांनी विरोधकांपुढे दोन पावले माघारी घेतली पण आपल्या वैयक्तिक हेवेदाव्याचा जनतेला परिणाम भोगावे लागू नये म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. नीरा येथील वॉर्ड नंबर सहामध्ये अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीमध्ये चुकीच्या पद्धतीने बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील रस्त्याचा प्रश्न मागील 25 वर्षांपासून प्रलंबित होता; मात्र काकडे सरपंच झाले आणि त्यांनी लोकांमध्ये सामोपचाराने सुमारे सव्वा किलोमीटरचा रस्ता या भागातून काढून घेतला. नागरिकांनी हीच काकडे यांना साथ देत या भागातून रस्ता दिला. काकडे यांनी तातडीने निधी टाकून हा रस्ता तयार करून घेतला. अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्यामुळे नागरिकांनी त्याचवेळी काकडे यांचे आभार मानले. एक ना अनेक अशी अनेक कामे राजेश काकडे यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत केली. नीरा शहराला मुख्य बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रयत्नातून शिवाजी चौक दरम्यानचा चौपदरीकरणाचा रस्ता त्यांनी तयार करून घेतला आणि नीरेच्या वैभवात भर टाकली आज या रस्त्यावरून जाताना मोठ्या पेठेतून जात असल्याचा अनुभव लोकांना येत असतो त्याचबरोबर इतरही रस्त्यांचे सुशोभिकरण त्यांनी केले. सरपंचपदाच्या कार्यकाळामध्ये नीरा ग्रामस्थांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता त्यासाठी फिल्टर योजना त्यांनी कार्यान्वित केले कोट्यवधी रुपये खर्च करून नीरेकरांची कावीळ, टायफाईड अशा सात रोगांपासून त्यांनी सुटका केली. मागील काळात अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे नीरेकर हैराण झाले होते, पाऊस आला की लोकांना गढूळ पाणी प्यावे लागत होते यापासून काकडे यांनी लोकांची सुटका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचा आदर्श माझ्या समोर आहे. नीरा शहराचा विकास हेच माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. मला नीरा शहरातील नागरिकांनी मोठा पाठिंबा मिळाला.विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी विश्वास दाखवला आणि तरुणांनी खंबीर साथ दिली म्हणून मी नीरा शहराचा चांगला विकास करू शकलो. यापुढे सुद्धा आणखी विकासकामे प्रस्तावित आहेत आणि लोकांच्या सहकार्यातून ती आपण लवकरच तडीस नेणार. आता नीरा शहर बदलत असून एक आधुनिक आणि स्वच्छ सुंदर शहर म्हणून नीरा शहर आपल्याला पाहायला मिळणार आहे – राजेश काकडे, उपसरपंच, नीरा ग्रामपंचायत “त्यांचा’ आदर्श डोळ्यासमोर ठेवून… अशा या लोकाभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा 2021 मध्ये ग्रामस्थांनी संधी दिली आणि त्यांच्याकडे उपसरपंचपदाची जबाबदारी दिली. यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा कामाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार संजय जगताप यांच्या सहकार्यातून नीरा ग्रामस्थांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या माध्यमातून ग्रामस्थांना आता तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा करता येणार आहे आणि चांगल्या पद्धतीचे शुद्ध पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर नीरा शहरात तीन प्रमुख रस्ते आहेत या तिन्ही प्रमुख रस्त्यांचा काम काकडे यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे चालले आहे. आमदार संजय जगताप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण हे काम करत असल्याचे ते आवर्जून सांगतात. प्रमुख कामे कचरामुक्त नीरा केली कचराकुंडीमुक्त नीरा केली कचऱ्याचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले शहरातील सर्व रस्ते उत्तम प्रतीचे केले बंदिस्त गटार योजना राबवून गटारमुक्त शहर रस्त्यांचे मजबुतीकरण आणि सुशोभिकरण केले. पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जलजीवन मिशन अंतर्गत 42 कोटी रुपयांची योजना मंजूर करून घेतली. सामाजिक एकोपा राखत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. पिंपरे ते शिवतक्रारवाडी दरम्यानचा पाणंदरोड खुला केला. शासन आपल्यादारी योजना राबवून लोकांची कामे मार्गी लावली. कोविड काळात लोकांना मदत, कोविड सेंटर चालवले. अन्नधान्य पुरवले, लोकांना मोफत जेवण, धान्य किट वाटप करोना काळात लोकांना मोफत रुग्णवाहिका पुरवली. संकलन : राहुल शिंदे, नीरा