IDBI Bank Recruitment 2023 : स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होणार भरती असा करा नोकरीसाठी अर्ज

IDBI Bank SO Recruitment 2023 : आयडीबीआय बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती करणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ( Bank job )
बँक ऑफ इंडिया (IDBI) द्वारे विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 09 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज आणि फी भरण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. IDBI बँक ही भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे आणि जीवन विमा महामंडळाची उपकंपनी आहे. ( IDBI bank job)
IDBI भर्ती अर्ज फी
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील अर्जदारांना IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 1000 रुपये अर्ज फी भरावी लागेल, तर SC/ST/PH उमेदवारांना 200 रुपये अर्ज फी भरावी लागेल.अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट, ई चलन द्वारे भरावी लागेल.
आयडीबीआय बँक नोकऱ्या रिक्त पदांची संख्या
IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी 86 रिक्त जागा आहेत.
व्यवस्थापक ग्रेड B 46 जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक एजीएम ग्रेड सी 39 जागा
उप महाव्यवस्थापक (DGM) – ग्रेड D 01 जागा





