ICC Women’s ODI rankings | क्रमवारीत मिताली राजची घसरण
Updated On:

दुबई – आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रिकेट क्रमवारीत महिला क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या मिताली राजची घसरण झाली आहे. ती आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
गोलंदाजी क्रमवारीत मात्र भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने दुसरे स्थान पटकावले आहे. याआधी ती चौथ्या स्थानावर होती. नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली.
भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने गमावली. मात्र, भारतीय महिला संघाने त्यात चांगली कामगिरी केली. या मालिकेत झुलनने सर्वांत चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच तिचे क्रमवारीतील स्थान वधारले आहे. या क्रमवारीत भारताची स्मृती मानधना सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.





