ICC Test Rankings : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून खेळवला जाणार आहे. याआधी आयसीसीने नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांची क्रमवारीत घसरण झाली आहे तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज टेंबा बावुमाने विराट कोहलीला मागे टाकले आहे. पण गोलंदाजी क्रमवारीत भारताचा दबदबा कायम आहे. जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे.
कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट (895 Rating) अव्वल स्थानावर आहे. तर हॅरी ब्रूकने (854 Rating)दोन स्थानांनी झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (830 Rating)तिसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वी जैस्वाल (825 Rating)याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. ऋषभ पंत (736 Rating) सहाव्या क्रमांकावर कायम आहे. शुभमन गिलला (673 Rating)एका जागेचे नुकसान झाले असून तो 18 व्या क्रमांकावर आला आहे.
HISTORY CREATED BY BAVUMA 🫡
Temba Bavuma enters the ICC Top 10 Test batting rankings for the first time in his 10-year Test career
TOP 10 ICC TEST BATTERS
1. Joe Root
2. Brook
3. Williamson
4. Jaiswal
5. D Mitchell
6. R Pant
7. Kamindu
8. S Smith
9. S Shakeel
10. TEMBA BAVUMA pic.twitter.com/QJFfOZd4ws— All Cricket Records (@Cric_records45) December 4, 2024
टेम्बा बावुमाने कोहलीला टाकले पिछाडीवर…
टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू कोहलीची क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. तो 14 व्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बावुमाने (715 Rating) 14 स्थानांची झेप घेतली आहे. तो 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. बावुमाने कोहली आणि ट्रॅव्हिस हेडसह अनेक महान खेळाडूंना मागे सोडले आहे. ट्रॅव्हिस हेड 11 व्या स्थानावर आहे.
गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा…
गोलंदाजी क्रमवारीत भारताचा दबदबा कायम आहे. जसप्रति बुमराह (Rating 883) अव्वल स्थानावर आहे. तर रविचंद्रन अश्विन (Rating 807) चौथ्या स्थानावर कायम आहे. रवींद्र जडेजाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Rating 865) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड (Rating 860) तिसऱ्या स्थानावर आहे. कुलदीप यादवची एका स्थानाची घसरण झाली आहे. तो 19 व्या स्थानावर आला आहे.