Jasprit Bumrah ICC Test Ranking No 1 : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीनुसार भारतीय क्रिकेट संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कसोटी गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, २०२६ मध्ये भारताने अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नसला, तरी बुमराहच्या रेटिंगवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. कसोटी क्रमवारीत फलंदाजांची स्थिती – (Jasprit Bumrah Ranking) कसोटी फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जो रूट ८८० गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ७५० गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. तर, शुबमन गिलने एका स्थानाची झेप घेत ७३० गुणांसह नववे स्थान पटकावले आहे. हॅरी ब्रूक दुसऱ्या तर ट्रेव्हिस हेड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. BCCI to decide on Bumrah, Shami for Afghanistan Test BCCI will soon decide Jasprit Bumrah’s participation and Mohammed Shami’s possible return for India’s one-off Test against Afghanistan amid workload concerns after IPL 2026. pic.twitter.com/gtrVNbjgZk — Tech Crypto Cricket Hub (@Anurag9793) May 13, 2026 गोलंदाजीमध्ये बुमराहचा दबदबा – (Jasprit Bumrah Ranking) जसप्रीत बुमराह ८७९ गुणांसह कसोटी गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी आहे. भारताचा मोहम्मद सिराज १२ व्या, तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अनुक्रमे १४ व्या व १५ व्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क (दुसरे स्थान) आणि पॅट कमिन्स (चौथे स्थान) यांनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे. हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi Advice : “वैभवची खरी परीक्षा अजून बाकी…”, १५ वर्षीय युवा खेळाडूला द. आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंने दिला महत्त्वाचा इशारा वनडे रँकिंगमध्ये भारत ‘विश्वविजेता’ – (Jasprit Bumrah Ranking) Jasprit Bumrah Ranking : मैदानात न उतरताही बुमराहचा धमाका! कसोटी रँकिंगमध्ये ‘नंबर १’ चं सिंहासन कायम; पाहा भारताचा जलवा एकदिवसीय सामन्यांच्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये भारतीय संघाने ११8 गुणांसह आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. न्यूझीलंड ११३ गुणांसह दुसऱ्या तर विश्वविजेता ऑस्ट्रेलिया १०९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेने (१०२ गुण) पाकिस्तानला (९८ गुण) मागे टाकत चौथे स्थान मिळवले असून पाकिस्तानची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे संघ पहिल्या आठमध्ये कायम आहेत.