Ibrahim ali khan and Khushi kapoor | अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान बॉलीवूड पदर्पणासाठी सज्ज झाला आहे. ‘नादानियाँ’ असे त्याच्या चित्रपटाचे नावं आहे. या चित्रपटात बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर देखील पाहायला मिळणार आहे. या दोघांची जोडी या चित्रपटात कमाल दाखवण्यास यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. साऊथ दिल्लीची मुलगी पिया (खुशी कपूर) आणि मध्यमवर्गीय मुलगा अर्जुन (इब्राहिम अली खान) जो डिबेट टीमच्या कर्णधार बनण्याचं स्वप्न पाहत असतो. या दोघांची ही गोष्ट आहे. पिया आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेमही असतं. मात्र नंतर अर्जुन हे सगळं नाटक करत असल्याचं समोर येतं. Ibrahim ali khan and Khushi kapoor | सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात इब्राहिम आणि खुशीसह महिमा चौधरी, दीया मिर्झा आणि जुगल हंसराज हे कलाकार देखील पाहायला मिळत आहे. Ibrahim ali khan and Khushi kapoor | ‘नादानियाँ’ सिनेमा ७ मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. शौना गौतम यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहर, अपूर्वा मेहता, सोमेन मिश्रा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हटके लव्ह स्टोरीच्या माध्यमातून लवकरच इब्राहिम आणि खुशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत Ibrahim ali khan and Khushi kapoor | हेही वाचा: Pune : बापचं बनला अत्याचारी! १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; घटनेने खळबळ, नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल