बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत; परंतु या सर्व चर्चा रंगत असताना इब्राहिम अली खान याने दाखवून दिले आहे की, तो जिथेही पाऊल टाकेल तिथे यश मिळेल. सध्या टिकटॉकच्या जमान्यात इब्राहिमनेही स्वत:ला सुपरस्टार म्हणून सिद्ध करून दाखविले आहे.
वास्तविक, इब्राहिमने टिकटॉकवर नुकतेच पर्दापण केले आहे. असे असूनही त्याचा व्हिडीओ ज्या प्रकारे व्हायरल झाला आहे, यावरून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सैफचा मुलगा इब्राहिम टिकटॉकच्या माध्यमातून रातोरात स्टार झाला आहे. या प्लॅटफॉर्मवर त्याला खूपच प्रतिसाद मिळत आहे.
इंस्टावर इब्राहिमचे फक्त तीनच व्हिडीओ आहेत. यातील दुसऱ्या व्हिडीओला तब्बल 9.2 मिलियन चाहत्यांनी पाहिले आहे. तर शेवटचा व्हिडीओही सुमारे 9.7 मिलियन लोकांनी पाहिला आहे. यावरून त्याचा चाहतावर्ग कोटींच्या संख्येत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, ज्या व्हिडीओला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली त्यात फक्त आणि फक्त इब्राहिमच आहे. तेही डबल रोलमध्ये. दरम्यान, इब्राहिमने लॉकडाऊनमध्येही संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.