Rupali Thombre Patil | रुपाली ठोंबरे पाटील यांचे अनेकदा रुपाली चाकणकरांसोबत खटके उडत आहेत. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. याचदरम्यान पक्षाने नव्याने प्रवक्त्यांची नियुक्ती केली. त्यातून रुपाली ठोंबरे पाटलांना वगळण्यात आले. याशिवाय आमदार अमोल मिटकरी यांनाही वगळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यामागे वारंवार पक्षविरोधी विधाने करणे हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कथित आत्महत्याप्रकरणात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात रान पेटवले होते. यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. पण ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. Rupali Thombre Patil | या घटनेनतंर रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट शेअर केली होती. “नमस्कार जय महाराष्ट्र, मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी,सौ.वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. या यादी बद्दल.अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल,” असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले होते. Rupali Thombre Patil | आपला इतिहास हा अन्याय सहन करणार्यांचा नाही यानंतर आज रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट पक्षातील व्यवस्थेवर टीका केली आहे. “शेतकरीकन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार. माझा आवाज दाबला जाईल? प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आपला इतिहास हा अन्याय सहन करणार्यांचा नाही; गरज पडली तर ‘ख्वाडा’ करणार्यांचा आहे,” असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर आता विविध चर्चांना उधाण आले आहे. Rupali Thombre Patil | हेही वाचा: “मी जे गमावलं त्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही”; सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज भावूक