“मी अशी राष्ट्राध्यक्ष होईल ज्याला कॉमन सेन्स असेल..” ; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा कमला हॅरिस यांच्याकडून खरपूस समाचार

US Presidential Election । अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढत अत्यंत रंगतदार होत आहे . त्यातच दोघांमध्ये शाब्दिक चकमक देखील होत आहे. याच पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये कमला हॅरिस यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, मी सर्व अमेरिकन नागरिकांना अध्यक्ष होण्याचे वचन देते. देशाला पुढे नेण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी देशाला जोडणारा राष्ट्रपती होईन. एक राष्ट्रपती जो वाचू शकतो आणि ऐकू शकतो. एक राष्ट्रपती ज्याला कॉमन सेन्स देखील असेल.” असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.
काय म्हणाल्या कमला हॅरिस? US Presidential Election ।
अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी शुक्रवारी शिकागोमध्ये डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या शेवटच्या दिवशी अधिकृतपणे पक्षाची अध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली. यावेळी त्यांनी सांगितले की, “आम्हाला विजयासाठी काम करावे लागेल. गेल्या काही आठवड्यात मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रवास माझ्या अपेक्षेपलीकडचा आहे. माझा प्रवास माझ्या आईसारखाच अद्भुत आणि आव्हानात्मक आहे. मला रोज त्याची आठवण येते. मी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ही उमेदवारी स्वीकारते” असे त्यांनी म्हटले. कमला हॅरिस म्हणाल्या की, “मी सर्व अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष होण्याचे वचन देते. देशाला पुढे नेण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. देशाला जोडणारा राष्ट्रपती मी होईन. एक राष्ट्रपती जो वाचू शकतो आणि ऐकू शकतो, एक राष्ट्रपती ज्याला कॉमन सेन्स देखील असेल.” असे त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? US Presidential Election ।
या अगोदर ट्रम्प यांनी एका भाषणात म्हटले होते की, डेमोक्रॅट कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी (कमला हॅरिस) सांगितले होते की, आमच्याकडे योग्य गोष्ट करण्यासाठी 70 दिवस आहेत. 70 दिवसांनंतर आम्ही पुन्हा पूर्वीप्रमाणे काम सुरू करू शकतो! त्यांचा अर्थ असा आहे की त्यांना निवडणूक जिंकायची आहे आणि नंतर कट्टर डाव्या, मार्क्सवादी/समाजवादी धोरणांनी आपला देश नष्ट करायचा आहे. आपण हे होऊ देऊ शकत नाही आणि तसे झाल्यास आपला देश राहणार नाही. यूएसए राख होईल.”असे त्यांनी म्हटले.


