Anjali Damania on Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात कनेक्शन समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्सही बजावण्यात आली. मात्र आजारपणाचे कारण देत त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नसल्याचे म्हंटले जात आहे. यावरून सामाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांना सुनावले आहे. ‘रुपाली चाकणकर या चौकशीसाठी एसआयटीसमोर जाणार नाहीत, अशी माहिती मला मिळाली. मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याने नाशिकला येता येणार नाही, असे अजब कारण त्यांनी दिले आहे,’ असे अंजली दमानिया यांनी म्हटले. Rupali Chakankar यापूर्वी आपण रुपाली चाकणकर यांना अनेकदा नाशिकला जाताना पाहिले आहे. तिकडे जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसताना, केक खाताना रुपाली चाकणकर यांना पाहिले आहे. मात्र, आता त्यांनी एसआयटी चौकशीला नकार दिला आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले. Anjali Damania on Rupali Chakankar … तर चाकणकर यांना अटक करावी लागेल एसआयटीने पहिले समन्स पाठवून त्या आल्या नाहीत. आता एसआयटीने त्यांना दुसरे समन्स पाठवावे. त्यानंतरही रुपाली चाकणकर चौकशीसाठी आल्या नाहीत तर एसआयटीला कोर्टाकडून आदेश घ्यावे लागतील. पहिले चाकणकर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट घ्यावे लागले. त्यानंतर अजामीनपात्र वॉरंट घेऊन रुपाली चाकणकर यांना अटक करावी लागेल. आता बघू रुपाली चाकणकर यांना कधी बुद्धी येते आणि त्या कधी एसआयटीपुढे जातायत? असेही अंजली दमानिया यांनी म्हटले. दरम्यान, रुपाली चाकणकरांच्या या भूमिकेमुळे त्यांचे खरात प्रकरणात नेमकं कनेक्शन काय? याचे गुढ आता वाढत चालले आहे. Anjali Damania on Rupali Chakankar हेही वाचा: US-Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा युटर्न ! आधी इराणला संपवण्याची शपथ, आता होर्मुझच्या मुद्द्यावर युद्ध संपवण्याचा आग्रह