….तर सैन्यात भरती व्हायचे होते – पंतप्रधान 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज खिलाडी अक्षय कुमारने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी आयुष्यातील अनेक गुपिते उघडली. यावेळी त्यांनी सैन्यात भरती होण्याची इच्छा असल्याचेही सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. सैनिक रस्त्याने दिसल्यावर मीही अन्य लहान मुलांप्रमाणे उभा राहून सॅल्यूट मारत होतो. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी छोटी नोकरी मिळाली असती तरी माझ्या आईने गावात गोड वाटले असते, असे मोदींनी सांगितले.

तुम्हाला राग येतो का असे अक्षयने विचारल्यावर मोदी म्हणाले कि, दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिल्याने राग व्यक्त करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. मी स्वतःच जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.