मुंबई – बॉलिवूडची सर्वाधिक बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान आता वेगळे झाले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. असे असूनही दोघांना एकत्र ठेवणारा एक धागा आहे, तो म्हणजे त्यांचा मुलगा. अरहान हा अरबाज आणि मलायका यांचा एकुलता एक मुलगा आहे.
अरबाज आणि मलायका बद्दल बोलायचे झाले, तर 1998 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाला 18 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर मे 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला असून, आता हे दोघेही आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत.
मात्र, असे असूनही हे दोघे अनेकदासोबत स्पाॅट होतात. दरम्यान, “लग्नाच्या 25 व्या वर्षी मला परत एकदा मलायका अरोरा हिच्यासोबत लग्न करायचे आहे.’ असं अरबाज काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. काही वर्षांपूर्वी अरबाज खान हा साजिद खान याच्या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अरबाज खान असं म्हणाला होता.
अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यावर मलायका अरोरा ही तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन याला डेट करत आहे. मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न करणार आहेत. मात्र, या सर्व अफवा असल्याचं नंतर समोर आलं होत.
दरम्यान, अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट होऊन अनेक वर्ष झाले आहेत. मात्र, याच महिन्यात मलायका आणि अरबाज खान यांच्या लग्नाला तब्बल 24 वर्ष पुर्ण होत आहेत. आणि अश्यातच पुन्हा एकदा साजिद खानच्या शोमधील अरबाज खानचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.