पुणे:” मी वनमंत्री आहे, वाघाला मला चांगलं हाताळता येत,” अशा शब्दात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मुनगंटीवार यांच्या आदेशानेच नरभक्षक झालेल्या वाघिणीची शिकार करण्यात आली होती. या पार्शवभूमीवर मुनगंटीवारांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
सध्या राज्यात भज आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून धुमशान सुरु आहे. “वेळेत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. तर राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत,असा पलटवार राऊतांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा मुनगंटीवार यांनी राऊतांवर पाळीवर केला आहे. त्यामुळे भाजप सेनेच्या नेत्यांमधील कलगीतुरा चांगलाच रंगताना पाहायला मिळत आहे.
मुनगंटीवार म्हणाले की ‘माझी भाषा कधीही तोडणारी नाही तर जोडणारीच आहे. मी वनमंत्री आहे. वाघाला सांभाळून ठेवणे माझी जबाबदारी आहे. तसेच घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, हे मी फक्त महितीत्सव बोललो, राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली नाही.
माझ्या बोलण्याचा विपर्यास करत राईचा पर्वत केला, असे अग्रलेख लिहून युती तोडायचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत मुनगंटीवारांनी संजय राऊतांना सुनावले आहे.