Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकर दहीहंडी उत्सवानिमित्त एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शहराबाहेर गेली होती. मात्र विमान प्रवास करून पुन्हा मुंबईत परतण्यासाठी तिला त्रास सहन करावा लागला. त्याबाबत तिने इनस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. अमृताने विमान प्रवासाविषयी सांगितले की, “साधारण १० वेळा हनुमान चालिसा पठण करून मी पोहोचले आहे. आता इथून घरी जाण्यासाठी कोणाची होडी वगैरे मिळणार आहे का?”, असे ती विचारते. Amruta Khanvilkar | तर दुसऱ्या व्हिडिओत ती म्हणते की, “प्रवास सुरूच आहे. माझी फ्लाइट सकाळी ७ वाजता होती. त्या फ्लाइटने टेकऑफ केलं ९:३० वाजता…त्यानंतर जवळपास पाऊण ते एक तास मी विमानातच होते. आता विमान लँड झालं. आता विमानतून उतरल्यावर आम्हाला बस मिळाली, मग सामान मिळणार, त्यानंतर टॅक्सी किंवा रिक्षाने भर पावसात घरी जायचं आहे. एकंदर काय प्रवास सुरूच आहे,” असे ती म्हणते. Amruta Khanvilkar | तसेच मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असं आवाहनही अमृता नागरिकांना करते. दरम्यान, मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Amruta Khanvilkar | हेही वाचा : Actor Gulshan Devaiah : कांतारा सिनेमात प्रसिद्ध बॅालिवूड अभिनेत्याचे एण्ट्री; दमदार लूकने वेधले लक्ष, उत्सुकता शिगेला!