‘माझी कधी हिंमत झाली नाही…’; तृप्ती डिमरीने केला खुलासा

Trupti Dimri | अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहे. अल्पावधीतच तिने सिनेइंस्स्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच ती करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘धडक २’ पाहायला मिळणार आहे. यामध्ये तृप्तीने विधी नावाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी सांगताना तिने तिच्या आयुष्यातील काही अनुभव शेअर केले आहेत.
तृप्ती डिमरी म्हणाली, “मी खूप गोष्टींना सामोरी गेली आहे आणि कधीच त्या विरोधात काहीच बोलले नाही. ३० वर्षांच्या आयुष्यात मी कितीतरी गोष्टींबद्दल मौन बाळगले आहे. माझी कधी हिंमत झाली नाही लोकांना सांगण्याची की हे चुकीचं आहे. मी दिग्दर्शिका शाझियाला मला विधीसारखं व्हायचं असल्याचे सांगितले होते. जिच्यात कोणालाही न घाबरता खरं बोलण्याचं धाडस असणं गरजेचं आहे; आता मी गोष्टींसाठी उभी राहत आहे.”
‘धडक २’ चित्रपटात अभिनेता तृप्तीसह सिद्धार्थ चतुर्वेदीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं शाझिया इक्बालने दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये तृप्तीने विधी तर सिद्धार्थने निलेश हे पात्र साकारलं आहे. हा चित्रपट येत्या १ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूर व इशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेला ‘धडक’चा
हा सिक्वेल आहे. Trupti Dimri |
तृप्तीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिला ‘अॅनिमल’ चित्रपटातील भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती ‘बॅड न्यूज’, ‘भूल भुलय्या ३’ या चित्रपटांमध्ये झळकली. तृप्ती ‘धडक २’ शिवाय संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे. Trupti Dimri |
हेही वाचा :
१७ वर्षांनंतर ‘तुलसी’ पुन्हा येतेय ! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ आजपासून घराघरांत





