पंतप्रधान मोदींवर माझे प्रेम, परंतू ते द्वेष करतात – राहुल गांधी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी प्रेम करतोच, त्यांचा द्वेष करीत नाही. परंतू ते का द्वेष करतात माहित नाही, असे उद्गार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यानी काढले. त्यावेळी तरूणांमधून मोदी मोदीचा जयघोष केला. तर काही तरूणांनी राहुल राहुल असा जयघोष केला.

युवा सुराज्य एनएसीयू प्रतिष्ठान अंतर्गत पुण्यात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आर जे मलीष्का आणि सिनेअभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी सॅम पित्रोदा, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजीत कदम तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देखील दिले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय घेतल्या नंतर देशातील लाखो तरुणाच्या नोकर्‍या गेल्या. त्यामुळे बेरोजगारी वाढली असून याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे. मात्र यावर मोदी सरकारने काही उपाययोजना केल्या नाही. अशा शब्दात त्यानी मोदींवर निशाणा साधला.

तसेच ते पुढे म्हणाले की, सैन्य दलाने पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईकचे पूर्ण श्रेय सैन्य दलास देणे आवश्यक असताना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले. हे पाहून वाईट वाटले असून खऱ्या अर्थाने सैन्य दलास श्रेय दिले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त तर स्ट्राईकचे मतासाठी राजकारण करू नये.

जागृत तरुणांनी राजकारण्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले पाहिजे. लोकशाहीमध्ये कोणीही प्रश्न विचारू शकतो. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारा मी त्याची उत्तरे देईल. परंतु नरेंद्र मोदी हे तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही. तर दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीची आश्‍वासन देणार्‍या नरेंद्र मोदी यांनी तरुणाच्या प्रश्नाची उत्तरे द्यावी. मात्र ते तुमच्या समोर उभे राहून या प्रश्नाची उत्तरे देण्याचे त्यांच्यात धाडस नाही. अशा शब्दात पंतप्रधानवर सडकून टीका केली.

यावेळी राजकारणातून निवृत्त होण्याच वय काय असावे असे एका विद्यार्थिनी विचारताच राहुल गांधी हे काही क्षण थांबत मला वाटते की, 60 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावे असे वाटते. असे सांगताच सर्वानी शिट्ट्या आणि टाळ्या वाजून दाद दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.