Pune naval pool accident : पुणेकरांना सुन्न करणारी भीषण अपघाताची घटना नवले पुलावर घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेत. अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी मालवाहू ट्रकने आठ ते दहा वाहनांना धडक देऊन एका कारला जोरदार धडक दिली. ही कार फरफटत नेऊन पुढे आणखी एका ट्रकला धडक दिली. त्यातून हा भीषण अपघात घडला. भीषण अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यानंतर स्फोट झाला आणि आग लागली. या दुर्घेटनेत मृत्यूमृखी पडलेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी पाऊनेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या मृतांमध्ये दोन महिला, एक बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या भीषण अपघाताची माहिती एका व्यक्तीने अग्निशमल दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर दिली. त्यानंतर अग्निशमल दलाचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यानंतर आणखी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर ट्रकखाली कार अडकल्याने रेस्क्यू व्हॅनमधील कटर, स्प्रेडर व इतर साहित्याच्या मदतीने कारमधून मृतदेह काढण्यात आले. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृतदेह काढण्यात आला. तर ट्रकमधून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर घटनास्थळी असणाऱ्या सर्वच्यांवर अंगावर सरकन काटा आला. रुग्णवाहिका चालकाकडून हळहळ घटनास्थळी अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, अधिकारी प्रभाकर उमरटकर, संतोष भिलारे व ४० जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या अपघातानंतर मृतदेह पाहिल्यानंतर रुग्णवाहिका चालक सचिन मोरे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. विविध अपघातांत मृत्यू झालेल्यांची वाहतूक यापूर्वी केली आहे. मात्र, या अपघातात मृतांची संख्या पाहून खूप दुःख झाल्याचे मोरे यांनी सांगितले. नवले पूल अपघातांचा डेथ झोन नवले पूलावर सातत्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. अनेक मोठे अपघात या ठिकाणी घडल्याने नवले पूल डेथ झोन बनला असल्याचे बोलले जात आहे. मागील काही वर्षांतील प्रमुख अपघांत.. -२१ ऑक्टोबर २०२१ : कंटेनरने पीएमपीएमएल बसला धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी. -२१ नोव्हेंबर २०२२ : सुसाट ट्रेलरने ४७ वाहनांचे नुकसान; अनेक जखमी. -१० फेब्रुवारी २०२४ : भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक; अनेक गंभीर जखमी. -२३ फेब्रुवारी २०२४ : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने सात ते आठ वाहनांना धडक. -३ मे २०२५ : सलग तीन अपघातांत तिघांचा बळी. -२५ जानेवारी २०२५ : कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू. हेही वाचा : आजच्या निकालातून ‘या’ स्टार्सचे भवितव्य ठरणार ; मोठ्या प्रमाणात केला होता प्रचार