‘मी एक मित्र गमावला आहे’, रतन टाटा यांच्या निधनावर मुकेश अंबानींची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. पद्मविभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी रात्री ११.३० वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रतन टाटा यांचे निधन हे केवळ टाटा समूहाचेच नाही तर प्रत्येक भारतीयाचे मोठे नुकसान आहे. मी आज एक प्रिय मित्र गमावला. असं लिहत अंबानी यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
मुकेश अंबानी यांनी शोक व्यक्त केला
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “हा देशासाठी एक दुःखाचा दिवस आहे. त्यांचे जाणे केवळ टाटा समूहासाठीच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने मला वैयक्तिकरित्या दु:ख झाले आहे. मी एक चांगला मित्र गमावल्यामुळे दुःखी आहे, ते एक दूरदर्शी व्यापारी आणि परोपकारी होते.’
ते पुढे म्हणाले, “त्यांच्या जाण्याने देशाने आपला दयाळू मुलगा गमावला आहे. टाटा यांनी संपूर्ण जगासमोर देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी जगातील चांगल्या गोष्टी भारतात आणल्या. त्यांनी टाटा कुटुंबाला संस्थात्मक केले. 1991 मध्ये त्यांनी त्यानंतर टाटा समूहापेक्षा त्याचा व्यवसाय ७० पटीने वाढला. रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योगपती होते, त्यांनी नेहमीच समाजाच्या भल्यासाठी काम केले. रतन टाटा यांच्या निधनाने भारताने आपला सर्वात दयाळू मुलगा गमावला आहे आणि 1991 मध्ये, समूहाचा ताबा घेतल्यानंतर टाटांनी 70 पट वाढ केली आहे.”





