जयंत पाटलांचा सेन्सॉर बोर्डवर हल्लाबोल; ‘त्या’ प्रोपगंडा फिल्म्सला मोकळीक अन् ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप

Phule Movie | महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, रिलीज आधीच चित्रपटावर मोठे संकंट उभे ठाकले आहे.
फुले चित्रपटातील काही दृश्यांवर राज्यातील महासंघाने आक्षेप नोंदविला आहे. त्यातच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केला आहे.
सेन्सॉर बोर्डाकडून सूचवण्यात आलेल्या बदलांच्या पत्राची प्रत शेअर करत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाच्या मानसिकेतेवर बोट ठेवलं आहे. जयंत पाटलांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या प्रोपगंडावर आधारित फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे.”
काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र “फुले” सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता… pic.twitter.com/T5UGUv2JSS
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 10, 2025
पुढे त्यांनी लिहिले की, “नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते”, अशा शब्दात जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला. Phule Movie |
फुले चित्रपटातील काही संवाद, काही दृश्ये सेन्सॉर बोर्डाने बदलण्यास सांगितले आहेत. याआधी ११ एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका प्रतिक गांधीने केली असून अभिनेत्री पत्रलेखा हि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. Phule Movie |
हेही वाचा:
Realme phone : भारतात आला ‘Realme’चा दणकट आणि जबरदस्त फोन! किंमत, फीचर्स एकदा पाहाच….




