Girish Mahajan : राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची चर्चा आहे. 17 मार्चला समोर आलेल्या या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभेत या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना आम्हीची अशोक खरातचा भांडाफोड केल्याची विधान केले होते. या प्रकरणात राजकीय नेत्यांचे फोटो समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे बोलले जात आहे. अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत 29 मार्चपर्यंत असल्याने त्याची कसून चौकशी केली जात आहे. आता या प्रकरणात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘मला या विषयाची दोन महिन्यांपूर्वी कल्पना आली होती’. असे ते म्हणाले आहेत. खरातांचा विषय अतिशय गंभीर आहे, ज्या पद्धतीने या नालायक माणसाने मुर्खपणा केलेला आहे. त्याने केलेली विकृती आत्तापर्यंत कोणी केलेली नसेल. महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. आत्तापर्यंत सात गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी खरात प्रकरणावर दिली. Girish Mahajan मला या विषयाची दोन महिन्यांपूर्वी कल्पना आली होती. तशी तक्रार मी पोलिसांकडे केली होती. तेव्हापासून याच्यावर कामही सुरू झाले होते. पोलिसांकडे माहिती होती, असा मोठा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे. Girish Mahajan गुरुवारी नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी या प्रकरणातील तपासाची दिशा आणि राजकीय आरोपांवर स्पष्टीकरण दिले. Girish Mahajan : ‘मला या विषयाची दोन महिन्यांपूर्वी कल्पना आली होती’; खरात प्रकरणावर भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा या प्रकरणाकडे मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेले आहे. या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. चौकशीतून सगळ्या गोष्टी बाहेर येतील,असेही महाजन म्हणाले आहेत. संतापजनक दावा Girish Mahajan पोलीस चौकशीत अशोक खराताने संतापजनक दावा केला आहे. महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचे त्याने म्हटले आहे. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. आता यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असं म्हणत त्याने केलेल्या विकृत कृत्याचे समर्थन केले आहे. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचीही फसवणूक Girish Mahajan महिलांचे लैंगिक शोषण झाले असल्याचे अशोक खरात प्रकरणात समोर आले होते. आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची देखील लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा : Coriander Storage: “फ्रिजशिवायही कोथिंबीर राहील ताजी; वापरा हे ३ सोपे उपाय”