मला स्वत:साठी काहीही नको, मी नव्या पिढीसाठी काम करतोय – मुख्यमंत्री नितीशकुमार

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच तेही उत्तर प्रदेश या सगळ्यांत जास्त जागा असलेल्या राज्यातून लोकसभेवर जाणार असल्याच्या बातम्या आहेत. मात्र या बातम्या ऐकून आपल्याला आश्चर्य वाटले. मला माझ्या स्वत:साठी काही नको आहे. मी नव्या पीढीसाठी काम करतो आहे असा दावा नितीश यांनी केला आहे.
अशा खोट्या गोष्टी ऐकून आपल्यालाला आश्चर्य वाटते. मात्र या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्यातच मला स्वारस्य आहे. जेवढे राजकीय पक्ष एकत्र येतील तेवढे चांगले. मला आता फक्त नव्या पीढीसाठी काम करायचे आहे.
ते पुढे म्हणाले की, देशातील स्थिती आज सगळे जण पाहतच आहात. सगळेच नियंत्रित केले जाते आहे. कोणतेच नवे काम होत नाहीये. आपली स्वत:ची काहीच निवड राहीलेली नाही. मात्र संघर्ष निर्माण करण्याची त्यांची इच्छा आहे. कारण संघर्ष सुरू झाला की त्यांचे काम आपोआप होत राहील. प्रसारमाध्यमांनाही नियंत्रित करण्यात आले आहे. अन्य कोणाच्या बातम्या नसतात. एकतर्फी बातम्या दिल्या जात आहेत. आता तर सोशल मीडियावरही कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.





