‘रणबीर कपूरवर टीका करण्याची माझ्यात हिंमत नाही..”; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री असे का म्हणाले?

अॅनिमल’ चित्रपटासाठी संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका होत असल्याच्या प्रश्नावर विवेक अग्निहोत्री यांनी हे उत्तर दिले. तर रणबीरला याबद्दल काहीही सांगितले गेले नाही, असेही ते म्हणाले. मी तुम्हाला आव्हान करतो की बॉलीवूडमध्ये अशा एकाही दिग्दर्शकाचे किंवा निर्मात्याचे नाव घ्या जो या स्टार्सबद्दल वाईट बोलत नाही. असे म्हणत त्यांच्यात जाहीरपणे काही बोलण्याची हिंमत आहे का? असा सवाल केला आहे. खरी समस्या स्टार्सची नाही, तर अशा लोकांची आहे जे काहीही साध्य न करूनही स्टार्ससारखे दिसतात, असे देखील ते म्हणाले.
विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा आगामी चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर’ आहे, जो बंगालच्या दुर्घटनेवर आणि हिंदू नरसंहारावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





