“मी त्यांना म्हणालो नाही की, मला पुरस्कार द्या”; भ्रमनिरास होताच डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Donald Trump On Nobel Peace Prize | यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाहीवादी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. मात्र गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न यंदा धुळीला मिळाले आहे. यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
“नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी मला फोन केला आणि म्हटले की, तुमच्या सन्मानार्थ मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. कारण तुम्ही खरोखरच या पुरस्कारासाठी पात्र होता. पण मी त्यांना अजिबात म्हणालो नाही की, मला तो पुरस्कार द्या. मला वाटते त्यांनी केले असेल. मी त्यांना शक्य तितकी मदत करत आहे. मला सर्वांत जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, मी आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवले,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
तर दुसरीकडे, व्हाईट हाऊसचे संप्रेषण संचालक स्टीव्हन चुइंग यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे नोबेल समितीवर टीका केली. ते म्हणाले, “नोबेल समितीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांततेसाठीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आहे. तरीही, ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आणि मानवतेची सेवा करण्यासाठी आपले कार्य सुरू ठेवतील. त्यांच्यासारखा दृढनिश्चयी आणि मानवतावादी व्यक्तिमत्त्व दुसरे कोणीही नाही.” व्हाईट हाऊसने नोबेल समितीवर शांततेपेक्षा राजकारणाला महत्त्व दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आपण तब्बल सात युद्धे थांबवली असल्याचे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी आपणच योग्य असल्याचे वारंवार म्हटले होते.
#WATCH अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प ने कहा, “जिस व्यक्ति को नोबेल पुरस्कार मिला है, उसने आज मुझे फ़ोन किया और कहा, ‘मैं इसे आपके सम्मान में स्वीकार कर रहा हूं क्योंकि आप सचमुच इसके हकदार थे’… हालांकि, मैंने यह नहीं कहा, ‘मुझे दे दो’। मुझे लगता है कि उन्होंने ऐसा किया… pic.twitter.com/XyldjywuFZ
— ANI_HindiNews (@AHindinews) October 10, 2025
मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार
व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारांतर्गत मचाडो यांना अल्फ्रेड नोबेल यांचे चित्र असलेले सुवर्णपदक आणि 1.1 कोटी स्वीडिश क्राउन (सुमारे 8 कोटी रुपये) रोख बक्षीस मिळेल नोबेल समितीने सांगितले की, मचाडो यांनी व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना चालना दिली आणि हुकूमशाहीपासून शांततापूर्ण मार्गाने लोकशाही प्राप्त केली. Donald Trump On Nobel Peace Prize |
मारिया कोरिना मचाडो आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना ‘व्हेनेझुएलाची आयर्न लेडी’ असे संबोधले जाते. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो शावेझ आणि सध्याचे नेते निकोलस मादुरो यांच्या हुकूमशाहीविरोधात उघडपणे आवाज उठवला. अनेकदा धमक्या, अटक यांना सामोरे जावे लागले, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. मारिया यांच्या या साहसी लढ्याने व्हेनेझुएलाच्या सीमा ओलांडून जगभरातील लोकशाहीप्रेमींना प्रेरणा दिली आहे. त्यांचा हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाहीसाठीच्या लढ्याला नवी चेतना देणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. Donald Trump On Nobel Peace Prize |
हेही वाचा:
Pune : नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांसाठी ३० कोटींचा अतिरिक्त निधी





