महाळुंगे इंगळे, – समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांचे दर्शन घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलो आणि प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून बाबा महाराजांच्या आशीर्वादाने निवडून आलो अशी भावना खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केली.
महाळुंगे इंगळे येथे समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या कार्तिकी उत्सवा सुरू आहे, त्यानिमित्त आमदार बाबाजी काळे यांनी बाबा महाराजांचे दर्शन घेऊन भाविकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांच्या वतीने तसेच विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास धनवटे यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी बाबा महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, जीवन मिंडे, अमन मिंडे, पप्पू राक्षे,पांडुरंग बनकर, किरण गवारे, संतोष भोसले, सम्राट तुपे, लीलाधर तुपे, माऊली भोसले, विशाल पवार, अतुल जावळे उपस्थित होते.
बाबाजी काळे म्हणाले की, माजी उद्योग मंत्री लीलाधर डाके यांच्या पुढाकाराने या परिसरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली आणि आज खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत कार्यरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.