Sanjay Raut : “निकाल काय लागेल याची भीती वाटतेय. त्यावर शहा म्हणाले…”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, थेट फोटो…
Sanjay Raut : त्यांनी एक्सवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एक फोटोही संजय राऊतांनी शेअर केला आहे.

Sanjay Raut : शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातील सुनावणीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे कपिल सिब्बल यांनी महत्वाचे मुद्यांवर कोर्टाचे लक्ष वेधले. यानंतर या सुनावणीत पुढे काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या सुनावणीचा संदर्भ देत मोठा दावा केला आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी एक्सवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एक फोटोही संजय राऊतांनी शेअर केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या कथित संवादाचा संदर्भ देत निशाणा साधला आहे. अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना, ”सब सेट हो जायेगा” असं म्हटल्याचा दावा राऊतांनी केला आहे. ते म्हणाले “काल या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांना महाराष्ट्र मिंधे म्हणून ओळखतो. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे आमचे आमदार, मंत्री फार घाबरलेत असं म्हटले. साहेब म्हणाले, का काय झाले? तेव्हा म्हणाले निकाल काय लागेल याची भीती वाटतेय. त्यावर शहा म्हणाले की भैय्या डरो मत, ये मेरी पार्टी है… सब सेटल है.”
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका संवादावेळी एक मोठं वक्तव्य केले आहे. “मुस्लिमांशिवायचा भारत हिंदुत्वाला मान्य नाही. मुस्लिमांशिवायचा भारत हवा असं एखादा म्हणत असेल तो हिंदू राहत नाही.” या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “त्यांनी भारतात येऊन असं बोलायला पाहिजे. दिल्लीत नागपूर इथे येऊन बोलावे. एकात्मकता महत्वाची आहे.”
सह्याद्री ते विमानतळ… एकच आश्वासन;
शिंदे: साहेब, आमच्या गटाचे मंत्री-आमदार घाबरले आहेत.
शहा: का?
शिंदे: सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर? आमदारांचं हेच म्हणणं आहे.बहोत डिस्टर्बड है सब लोक
शहा: अरे छोड़ो… चिंता मत करो. मेरी पार्टी है ये भैय्या, मैं देख लूँगा.
आधी सहा… pic.twitter.com/5YwwoeuWB6— Sanjay Raut (@rautsanjay61) August 30, 2026
संजय राऊत यांनी एक्सवरील ट्वीट
सह्याद्री ते विमानतळ… एकच आश्वासन;
शिंदे: साहेब, आमच्या गटाचे मंत्री-आमदार घाबरले आहेत.
शहा: का?
शिंदे: सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर? आमदारांचं हेच म्हणणं आहे.बहोत डिस्टर्बड है सब लोक
शहा: अरे छोड़ो… चिंता मत करो. मेरी पार्टी है ये भैय्या, मैं देख लूँगा.
आधी सहा गद्दार खासदार संसद कार्यालयात भेटले तेव्हाही तोच सूर होता — “सब सेट हो जाएगा.”
प्रश्न सरळ आहे:
सुप्रीम कोर्ट त्यांच्या खिशात आहे का?
संविधान खिशात घालून फिरणं हीच आता नवी आचारसंहिता झाली आहे का?
न्यायालयात सत्य आणि धर्म जिंकतो… की दुर्योधनाचं पाप?
पाहू.






