Kubbra Sait : अभिनेत्री कुब्रा सैत हिला मोठी लोकप्रियता सेक्रेड गेम्स या वेबसिरीजने मिळवून दिली. यानंतर तिने अनेक भूमिका केल्या ज्यामुळे तिच्या लौकिकतेमध्ये भर पडली. आता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेली फर्जी 2 या वेबसिरीजमुळे कुब्रा चर्चेत आहे. तिला या वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी नेमकी कशी मिळाली याविषयी तिने मुलाखतीत सांगितले आहे. इंडिया टुडेसोबतच्या संभाषणादरम्यान, कुब्राने खुलासा केला की तिने ‘फर्जी 2’ साठी अॅाफर मिळाल्यानंतर तिने लगेचच होकार दिला. Kubbra Sait अभिनेत्री म्हणाली, निर्मात्यांनी मला सांगितले की ते दुसऱ्या सीझनसाठी एक पात्र लिहित आहेत. मी म्हणाले, “ठीक आहे.” ते म्हणाले, “तुम्हाला आधी पहिला सीझन करावा लागेल.” मी म्हणाले, “ठीक आहे.” त्यामुळे आता त्याबद्दल विचार करण्याची काहीच गरज नाही. Kubbra Sait : “शो जसा साकारला आहे, त्याचा मला खूप अभिमान”; फर्जी 2 साठी क्रुबा सैत उत्सुक, ‘ती’ कडू आठवण केली शेअर या प्रोजेक्टचा भाग होता आले याबद्दल अभिमान व्यक्त करताना कुब्रा म्हणाली, “शो जसा साकारला आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी दुसऱ्या सीझनसाठी खूप उत्सुक आहे. मला आनंद आहे की मला मारलं गेलं नाही. मी लोकांना मारलं, पण मी वाचले. मी सिक्वेल आणि त्याच्याशी निगडित गोष्टींबद्दल कोणताही दबाव घेत नाही. ते राज आणि डीकेचं, सुमन कुमारचं आणि किशोरचं काम आहे. त्यांना ते करू द्या. मी या गोष्टींची काळजी करत नाही.” इंडस्ट्रीमधील लोकांना समजून घ्यायला वेळ लागतो, असे देखील वक्तव्य कुब्राने यावेळी बोलताना केले आहे.” जेव्हा ‘सेक्रेड गेम्स’ प्रदर्शित झाला, तेव्हा मी मीडियासाठी नवीन होते. मी नेहमीच माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी ‘रेडी’चं चित्रीकरण करत होते, तेव्हा पीआर म्हणजे काय हेसुद्धा मला माहीत नव्हतं. लोकांनी मला ओळखावं या इच्छेपोटी मी अक्षरशः एका रेस्टॉरंटच्या बाहेर लोकांच्या मुलाखती घेतल्या, अशी कडू आठवण अभिनेत्री कुब्रा सैत हिने सांगितली. हेही वाचा : Census 2027: देशात उद्यापासून जनगणनेला सुरुवात ; वैयक्तिक माहिती राहणार गुप्त तर लिव्ह इनचे जोडपे विवाहितांच्या यादीत ; वाचा आणखी मह्त्वाचे मुद्दे