येरवडा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आपण पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच लोहगाव विकासाचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खांदवे यांनी दीड वर्षांपूर्वी मतदार संघाचे अध्यक्ष पद स्वीकारले होते. वडगावशेरी मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार देखील आहेत.
याशिवाय महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर असताना देखील खांदवे यांनी आपला राजीनामा शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्याकडे दिला आहे. कार्यकर्त्याना वेळ देण्यासाठी आपण पदाचा राजीनामा दिल्याचेही खांदवे यांनी सांगितले.