Kajol : नव्वदच्या दशकापासून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री काजोल देवगण हिला महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय राज कपुर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोम येथील मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. काजोलने सिनेसृष्टीत केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दुग्धशर्करा योग म्हणजे काल काजोलचा वाढदिवस देखील होता. यामुळे पुरस्कार आणि वाढदिवस अशा दोन गोष्टींचा छान योग जुळून आला होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने आपल्या भावन व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. खरंतर मी निःशब्द झाले आहे, मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे, असं काजोल म्हणाली. तिने पुरस्कार स्वीकारल्यानंतर अस्सखलित मराठीतून आभार मानले. काय म्हणाली काजोल? आज माझा वाढदिवस आहे आणि आजच्या खास दिवशी माझा सन्मान करण्यात आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या मंचावर सगळे दिग्गज उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे माझं भाग्य आहे. खरंतर मी निःशब्द झाले आहे, मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे, अशी प्रतिक्रिया काजोल देवगणने दिली. अभिनेत्री काजोल देवगण यांना ‘स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४’ ने सन्मानित केल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार #Maharashtra #AshishShelar pic.twitter.com/VVyz3RbOkQ — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2025 पुरस्कार स्वीकारण्यासाठी आईची साडी नेसून आलीये… माझी आई इथे माझ्याबरोबर आलीये. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तिची साडी नेसून आज या कार्यक्रमाला आलीये. ही माझ्या आईची साडी आहे. हा पुरस्कार यापूर्वी माझ्या आईला देखील मिळाला होता, अशी आठवण सांगत आणि आज तोच पुरस्कार मला मिळतोय, यापेक्षा मोठा अवॉर्ड दुसरा काय असणार? मी सर्वांची खूप-खूप आभारी आहे. थैंक्यू, असंं म्हणत काजोलने सर्वांचे आभार मानले. तिने मराठीत बोलण्याला सुरूवात केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हेही वाचा : Dhanush: धनुषचा संताप; ‘रांझणा’च्या क्लायमॅक्समध्ये एआयने केला बदल, म्हणाला,“हा तो चित्रपट नाही…”