आय एम नॉट मसिहा

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कामगारांना सोनू सूदने आपापल्या प्रांतात परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली होती. त्याने विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतही केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यापासून ते ऑपरेशनसाठी लागणारा वैद्यकीय खर्च करेपर्यंत सर्व गरजवंतांची गरज सोनू सूदने या काळात पूर्ण केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


या दरम्यानचा अनुभव सोनुने मै मसीहा नही या पुस्तकात मांडले आहे. त्याने या पुस्तकाचे फ्रंट पेज सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पुस्तकामध्ये त्याने केलेल्या मदतीनंतर आलेला अनुभव सांगितला आहे. हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

आय एम नॉट मसिहा (मी तारणहार नाही) असं या पुस्तकाचं नाव आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. करोना काळात लोकांची मदत करताना आलेले अनुभव तो या पुस्तकातून सांगणार आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास सोनूने व्यक्त केला आहे. या पुस्तकाचं कव्हर पेज त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


दरम्यान सोशल मीडियावर त्याच्या या पुस्तकाची चांगलीच चर्चा होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याला पुस्तकाच्या शीर्षकावरून पुन्हा एकदा दाद दिली आहे. सोनूच्या या ट्विटरवर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. सोनूच्या फॅन्सनाही याने फार आनंद झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.