नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते ज्योतीरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात पक्षाध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळण्याच्या अवस्थेत आले आहे. सध्या त्यांच्या प्रवेशामुळे देशाच्या राजकारणात उलथा पालट दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले,’मी काहीच लपून-छपून करत नाही. तिकडेही उघडपणे गेलो आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले आणि इकडेही उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो, असे दिलखुलासपणे अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. त्यांच्या उत्तरानंतर सभागृहातील सदस्यांमध्ये हशा पिकला.’