खालापूर – आपण सदैव कामगारंच्या पाठिशी खंबीरपणे उभे असुन सतत लक्ष ठेवून राहणार आहे. याठिकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना मिळणाऱ्या सोई सुविधांमध्ये कोणी दुजाभाव करुन वंचित ठेवत असल्यास असल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. खालापूर टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी खासदार उदयनराजे भोसले यांची द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका येथे भेट घेत विविध विषयांवर चर्चा करत, मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कामगारांना उदयनराजे भोसले यांनी आश्वासित केले. या वेळी खालापुर् टोलचे सुरक्षाप्रमुख अनंता बैलमारे तसेच महामार्ग आपत्कालीन मदत यंत्रणेचे निरीक्षक प्रकाश यादव व इतर अनेक कामगार उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या वतीने उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी खासदार उदयनराजे भोसले यांची दीड महिन्यांपुर्वी सातारा येथे भेट घतली होती. या भेटीदरम्यान कामगारांच्या अडी – अडचणींसंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना शुक्रवारी (दि. 1) उदयनराजे भोसले यांची या कामगारांच्या शिष्टमंडळाने पुन्हा भेट घेत, मागण्यांचे निवेदन सादर केले.