Nivedita Saraf : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात भाजपसमर्थनार्थ केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. “भाजप म्हणजे आपलं घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे.” असे कोठारे म्हणाले होते. आता दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमात भाजपविषयी मोठं वक्तव्य केल्याने त्यांची वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. नुकताच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएने दणदणीत विजय मिळवला. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे सर्वत्र बिहार विधानसभेच्या विजयाचे जंगी सेलिब्रेशन केले जात आहे. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेक सिलिब्रिटी राजकीय मतं मांडताना दिसत आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘मी कट्टर भाजप समर्थक’ असल्याचे सांगितले. त्यामुळे निवेदता सराफ त्यांच्या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. नेमकं काय म्हणाल्या निवेदिता सराफ? नुकताच ठाण्यात एका कार्यक्रमात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर उपस्थित सगळेच आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा फार कट्टर बीपेजी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे, असे त्या म्हणाल्या. या विधानातून त्यांनी भाजपचे जाहीररित्या कौतुक करत समर्थक असल्याचे म्हटले आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीच्या हातून हा पुरस्कार स्वीकारणे. याहून मोठा सन्मान दुसरा नाही. तुमच्या प्रेमामुळेच मी आज हे यश अनुभवत आहे, असे त्यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली. हेही वाचा : “साताऱ्याचा सितारा करतो”; अभिजित बिचुकले निवडणुकीच्या मैदानात! थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल