‘मी पोलीस आहे, माझ्यावरील कारवाई महागात पडेल’; खऱ्या पोलिसाला बनावट पोलिसाची धमकी

पुणे – पोलिसालाच बनावट ओळखपत्राद्वारे कारवाई केल्यास महाग पडेल, अशी बतावणी तोतया पोलिसाने केल्याचे उघड झाले आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत 11 एप्रिल रोजी घडली.
वाहतुक विभागाचे पोलीस शिपाई सागर पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओमकार विलास धर्माधिकारी (वय 32, रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान धर्माधिकारी याला ऍड. राकेश सोनार यांनी केलेल्या युक्तीदानंतर जामीन मंजुर झाला आहे. ही केलेली कारवाई खोटी असल्याचे ऍड. सोनार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
धर्माधिकारी रात्री 8.45 च्या सुमारास टोयटो गाडीतून आलका टॉकीज चौकातून केळकर रस्त्याकडे चालले होते. त्यावेळी वाहन बाजूला घेऊन त्याने “मी पोलीस आहे. माझेवर कारवाई केल्यास महाग पडेल’ अशी धमकी दिली. मित्र असलेल्या पोलिसासारखे बनवून घेतलेले बनावट ओळखपत्र करून दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.




