नागपुरात हायप्रोफाईल सेक्सरॅकेट

स्पा-सलुनच्या नावाखाली सुरु होता कुंटनखाणा
नागपूर : उपराजधानीचे शहर नागपूरात उच्चभ्रू परिसरात पुन्हा एकदा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. प्रसिद्ध मॉलमधील एका स्पा-सलुनमध्ये सर्रासपणे देहविक्री केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून हायप्रोफाईल सेक्सरॅकेटचा पर्दाफाश करून दलाल महिलेला अटक करून पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील मनीषनगर परिसरातील जयंती नगरीतील ते सेरासेरा या प्रसिद्ध शॉपिं मॉलमध्ये गॉर्जियस ब्युटी सलून आहे. महिला दलाल गेल्या अनेक दिवसांपासून स्पा आणि सलुनच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा चालवत होती, अशी माहिती पोलिसांच्या सामाजिक शाखेला मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचून सलुनमध्ये पंटरला ग्राहक म्हणून पाठवले होते. महिला दलालने सलुनमध्ये मुलगी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.
पंटरने सौदाही निश्चित केला. सलुनमध्ये मुलगी येताच पंटरने इशारा करताच पोलिसांनी सलुनवर छापा टाकून महिला दलालला अटक केली. तसेच पीडित तरुणीची सुटका केली.





