पंजाबसमोर हैदराबादचे तगडे आव्हान ; विजयीमार्गावर परतण्यास हैदराबाद उत्सूक

मोहाली: आपापल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासमोर सनरायजर्स हैदराबादचे तगडे आव्हान असून विजयी मार्गावर परतण्यास दोन्ही संघ इत्सूक असून दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी हे त्यांचे शक्ती स्थान असून आजच्या सामन्यात हैदराबच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने या मोसमात 5 सामन्यांमध्ये 3 सामने जिंकले असून दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, पाचव्या स्थानी असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने देखील 5 सामन्यांमधील 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.

सनरायजर्स हैदराबादच्या संघाच्य फलंदाजांनी आता पर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत केले असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या दोन खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर 279 धावांसह पहिल्या स्थानी असून जॉनी बेयरस्टोने 262 धावा करत या यादीमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर, पर्पल कॅपच्या यादीत मोहम्मद नबी 7 बळी घेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्या संघाकडे आजच्या सामन्यातील संभाव्य विजयी संघ म्हणुन पाहिले जात असले तरी गत सामन्यात मुंबईच्या संघा विरुद्ध गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केल्यानंतरही फलंदाजांनी सपशेल शरनागती पत्करल्याने हैदराबादच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर, दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आता पर्यंत संमीश्र कामगिरीच्या आधारावर स्पर्धेत तीन विजय संपादन केले असले तरी मोक्‍याच्या क्षणी त्यांच्या मदहल्या फळीतील फलंदाजांना चमकदार कामगीरी करण्यात अपयश येत असल्याने त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या दोन फलंदाजांनी अर्धशतक झलकावूनही इतर फलंदाजांच्या अपयशा मुळे त्यांचा डाव 138 धावांमध्येच मर्यादीत राहिला त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास गोलंदाजांसोबतच त्यांच्या फलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करण्याअची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.