पिंपरी | पती, सासऱ्याने वेश्या व्यवसायास भाग पाडले

पिंपरी, (प्रतिनिधी) – विवाहितेला तिच्या पती आणि सावत्र सासऱ्यानेच वेश्या व्यवसायास भाग पाडले असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तसेच सावत्र सास-यानेही पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कासारवाडी येथे घडली.
याबाबत 32 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिडित महिलेचा पती व सावत्र सास-याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 8 मार्च 2022 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत कासारवाडी येथे घडली. आरोपी पती आणि सावत्र सासरे यांनी फिर्यादी यांना एक अॅप त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर पीडित महिलेच्या मोबाइलवर एका ग्राहकाने संपर्क केला असता आरोपीने पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पाठविले. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला.
महिलेने आरोपींना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली. तसेच आरोपी सावत्र सासरा यानेही पीडित महिलेच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.





