Pune News | पुण्यात कोथरूडमध्ये पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती-पत्नीच्या केसमध्ये मदत करते असे सांगत एकाला दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात आहे. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी त्या महिला वकिलाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे, या महिला वकिलाच्या विरोधात कोथरूड पोलिसात याआधीच एक गुन्हा दाखल झालेले आहे. पुरूषावर अत्याचार करून व्हिडिओ आणि फोटोच्या मदतीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात आला आहे. आता त्याच महिलेवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे प्रकरण? यातील फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक न्यायालयामध्ये केस सुरू आहे. या केसमध्ये मदत करते असे सांगून फिर्यादीला गौरी वांजळे यांनी जवळीक साधत ‘मी हाय कोर्टामध्ये वकील आहे तुला मदत करते’ असे म्हणून 38 वर्षे फिर्यादीला जवळीक साधत त्याच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ब्लॅकमेलिंग करत फिर्यादी कडून खंडणी मागितली. दरम्यान, तक्रारदाराला फसवणुक झाल्याचे लक्षात येताच मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.पोलिसांकडून महिलेला तपासासाठी नोटीस बजावली आहे. लवकरच चौकशी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.