वर्धापन दिनी जनसागर : पंचशील ध्वजारोहण, धम्मदीक्षा, धम्मप्रवचन, जनजागृती अभियान
देहुरोड – येथील ऐतिहासिक धम्मभूमीवरील भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि. 25) विविध धम्मजागृती अभियान, महाबुद्धवंदना, पंचशील ध्वजारोहण, धम्मदिक्षा, धम्मप्रवचन, विविध पुरस्कार वितरण, विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे दर्शनार्थ लाखो भीम बांधवांच्या बुद्ध विहाराजवळील उपस्थितीने जनसागर लोटला होता. भीम बांधवांच्या सेवार्थ विविध पक्ष, सामाजिक संस्था, मंडळ, प्रतिष्ठानने पोहे, चहा, पाणी, अल्पोपहारासह मसाला भात, पुरीभाजी, अन्नदान केले. पोलिसांच्या कडक बंदोबस्ताने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बह्मदेशाच्या रंगून येथे जागतिक परिषदेत भेट मिळालेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ति त्यांनी स्वहस्ते 25 डिसेंबर 1954 रोजी देहुरोड येथील मंदिरामध्ये स्थापन केली होती. मंदिरात मूर्ति बसविण्यावरुन सुरू असलेला वाद निर्वाळूण काढला होता. त्यामुळे मंदिराचे स्वरूप असणाऱ्या भगवान बुद्धाची मूर्ति असणारे बुद्धविहारास लौकिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भगवान बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापनानंतर डॉ. बाबासाहेब यांनी 1956 मध्ये नागपूर येथे दीक्षा घेतली होती. डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणानंतर याच धम्मभूमीवर विहारालगत अस्थीस्तुप असल्याने या भूमिस दिक्षाभूमी आणि चैत्यभूमि बरोबरच ऐतिहासिक धम्मभूमि प्राप्त झाले आहे. त्यामुळे वर्षातून दोन वेळा म्हणजे 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दिन आणि 25 डिसेंबर भगवान गौतम बुद्ध मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन दिन रोजी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी, भीमसैनिक, बौद्ध बांधवांच्या आगमनाने मोठ्या यात्रा देहुरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमिवर भरीत असतात.
देहुरोड येथील बुद्धविहार कृती समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, बोधिसत्व जनजागृती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहार ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, बहूजन समाज पक्ष, भीमशक्ती संघटना, रिपाई, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच, एकता महिला मंडळ, भीम आर्मी, द रायझिंग धम्मचक्र ग्रुप, युवारत्न सेवा समिती, बाळासाहेब गायकवाड युवा मंच, भारिप बहूजन महासंघ, समता सैनिक दल तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रतिष्ठान आदींनी विविध कार्यक्रमांनी वर्धापन दिन साजरा केला.
सकाळी साडेसातच्या सुमारास संघपाल शिरसाट यांच्या नेतृत्वात विदर्भातील भीमसैनिकांची अभिवादन रॅली, साहेबराव ओव्हाळ यांच्या हस्ते त्रिसरण पंचशील ध्वजारोहण, ज्येष्ठ उपासक एम. एफ. गडलिंगकर यांच्या हस्ते विदर्भ भीमसैनिकांचे स्वागत करण्यात आले.
भन्तेचे आगमन होताच पुष्पवृष्टी…
ऐतिहासिक बुद्धविहारातील बुद्धमूर्ती आणि डॉ. आंबेडकरांच्या अस्थीस्तुपाचे दर्शनार्थ राज्याच्या विविध भागातून आलेल्या बौद्ध बांधवांनी सकाळपासून गर्दी केली होती. परिसरात रांगा लावून शिस्तबद्ध दर्शन घेतले जात होते. बुद्धविहारालगत असलेल्या रेल्वे मैदानावर महाबुद्धवंदनेसाठी सकाळी दहापासून बौद्ध अनुयायी जमण्यास सुरुवात केली होती. सकाळी अकराच्या सुमारास भन्तेचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. आकर्षक सजावट केलेल्या मंचावर सर्व भन्ते आल्यानंतरभन्ते ज्ञानज्योती व अन्य भन्ते यांच्या हस्ते बुद्ध व डॉ. आंबेडकर यांचे प्रतिमांचे पुष्पहारानंतर मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आले.
त्रिरत्नवंदना, बुद्धवंदना, धम्मवंदना
एका धम्मसेवकाने प्रास्तविक करताना आंबेडकरी चळवळ गतिमान करणे काळाची गरज असून, त्याकरिता महाबुद्धवंदना घेण्यात आल्याचे नमूद केले. त्यानंतर शीलयाचना, क्षमायाचना झाली. अभिवादन गाथा झाली. त्यानंतर बुद्धपूजा, भीमस्मरण घेण्यात आले. त्रिरत्नवंदना, बुद्धवंदना, धम्मवंदना झाली. त्यानंतर संघवंदना घेण्यात आली. भिखू आशीर्वचन संपन्न झाले. उपस्थित बौद्ध बांधवाना दुःखातून सुटका होण्यासाठी संदेश दिला. भारत आज दुःखी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर बावीस प्रतिज्ञा घेण्यात आल्या.
मुलींनी धम्मपालन गाथा घेण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन परिषदचे उद्घाटन डॉ. किर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे मुक्ता दाभोळकर यांनी अंधश्रद्धेवरील मार्गदर्शन केले.
या वेळी मीना गायकवाड, रंजना सोनवणे, सविता वाघमारे उपस्थित होते. दुपारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे भदंत डॉ. विमलकीर्ती यांना प्रबुद्ध साहित्यरत्न, माजी केंद्रीय जहाज राज्यमंत्री दिलीप गांधी (संसदरत्न), डॉ. यु. एफ. जानराव (जीवकरत्न), ऍड. अर्जुनराव खुर्पे (न्यायरत्न), फारुक शेख (क्रांतिरत्न), बी. बी. शिंदे, रत्नाबाई गजभिये, सुनील कांबळे (भीमरत्न), पोलीस उपनिरीक्षक किशोर यादव (सदरक्षण रत्न), संघपाल शिरसाट (संघरत्न), किशोर आवारे (समाज भूषण), माजी पोलीस उपनिरीक्षक अबूकर लांडगे (समाजरत्न) आणि कमलनयन भोसले (युवा कलारत्न), तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, धम्मभूमि सुरक्षा समितीचे अरुण जगताप आदींचा कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, प्रकाश कांबळे, बसपाचे शहराध्यक्ष अशोक सोनवणे, सुरक्षा समितीचे अध्यक्ष मंदाकिनी भोसले आदींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.
दरम्यान दर्शनासाठी आलेल्या अनुयायांसाठी भोजनाची तसेच त्यांच्या आरोग्याच्या तपासणीची काळजी विविध संस्था आणि संघटनांनी घेतली होती. देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने मोफत आरोग्य सेवा, औषधे देण्यात आली.
ट्रस्टचे ऍड. अशोक रूपवते, ऍड. गुलाबराव चोपडे, संजय ओव्हाळ, सुमेध भोसले, रोहन गायकवाड, सुनील कडलक, बसपाचे चंद्रकांत गायकवाड, सतीश वाघमारे, भीमराव रोकडे, महादेव सुर्वे, प्रवीण साखरे, प्रकाश कांबळे, बामसेफचे यशवंत गायकवाड, बापूसाहेब गायकवाड तसेच अशोक वाघमारे, संगीता वाघमारे, महेश गायकवाड, विजय पवार, बाळासाहेब ढवळे, आरिफ मुजावर, अरुण सरोदे, जया भोसले, विद्या लोखंडे, अनिता जाधव, ज्येष्ठ उपासक एकनाथ आगळे, काळूराम कांबळे, विजय मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू, सारिका नाईकनवरे, ऍड. अरुणा पिंजण, गोपाळ तंतरपाळे, बजरंग दलचे संदेश भेगडे, अमित भेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी शहराध्यक्ष ऍड. कैलास पानसरे, लहू शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभाळे, मिकी कोचर, शिवसेनेचे माजी शहरप्रुमुख रमेश जाधव, रिपाईचे लक्ष्मण डिकाव, इंद्रपालसिंग रत्तू, सिद्धार्थ चव्हाण, बाबु दुधघागरे, दिलीप कडलक, मनसेचे मोझेस दास, जॉर्ज दास, किरण गवळी आदींनी विहारास भेट देत भगवान बुद्ध मूर्तिचे दर्शन घेवून डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थिस्तुपास अभिवादन केले.